राज्यस्तरीय बेसबॉलमध्ये पुण्याच्या खेळाडूंची बाजी

दहिवडी – येथील महात्मा गांधी विद्यालय व रयत संकुलमध्ये झालेल्या शालेय बेसबॉल स्पर्धेत पुण्याच्या संघाने प्रथम, नाशिकने द्वितीय तर कोल्हापूरने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या संघात कोल्हापूर प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक लातूर, तिसरा क्रमांक पुणे विभागाने मिळवला.

क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा व रयत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय बेस बॉल व नेट बॉल क्रीडा स्पर्धा दहिवडी येथे पार पडल्या. स्पर्धेसाठी राज्याच्या आठ विभागातून 16 मुलांचे व मुलींचे संघ सहभागी झाले होते.

-Ads-

यावेळी 700 खेळाडू व संघ प्रशिक्षक, पंच उपस्थित होते. नेट बोल स्पर्धेमध्ये मुलांच्या संघात कोल्हापूर, दुसरा अमरावती, तिसरा औरंगाबाद विभागाने पटकावला तर मुलींच्या संघात कोल्हापूर प्रथम, अमरावती द्वितीय, तर तिसरा नाशिक विभागाने पटकवला. प्रथम या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सील सदस्य प्रभाकर देशमुख तसेच आय. पी. एस. प्रविण इंगवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, प्राचार्य अनिल पोतदार, पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब सावंत उपस्थित होते. जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)