राज्यस्तरीय “तिरंगा रत्न’ पुरस्कार जाहीर

File Photo

नांदेड – “तिरंगा परिवार’ या नावाने संबंध महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या नांदेडच्या सामाजिक संस्थेने यावर्षीचे राज्यस्तरीय तिरंगा रत्न पुरस्कार घोषित केले आहेत. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी खासदार आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार जयंत साटम, “सीडबॉल’चे जनक दिपक मोरताळे, शिस्तप्रिय सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुनिरोद्दीन आणि नांदेडच्या श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विकास कदम यांची निवड करण्यात आली आहे.

देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता आणि विविध क्षेत्रातल्या सामाजिक योगदानासाठीचे तिरंगारत्न पुरस्कार “साईप्रसाद’ व “सफा बैतुलमाल’ या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन संस्थांना देण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये कुसुम सभागृहात संध्याकाळी 5.30 वाजता एका भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

“शान-ए-तिरंगा’ हा मरणोत्तर पुरस्कार शहीद बालाजी भगवानराव अंबोरे यांच्या कुटुंबियांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)