राज्यस्तरीय खुल्या हॉलीबॉल स्पर्धेत मुंबईचा आलमदेवी ए संघ विजेता

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथे मावळ तालुक्‍यात प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव ट्रॅकर्सच्या वतीने राज्यस्तरीय ओपन हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस आलमदेवी ए (मुंबई) हॉलीबॉल संघ, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अक्षय वायकर स्पोर्टस्‌ फाउंडेशन (वडगाव, मावळ) हॉलीबॉल संघाने पटकाविला.

या स्पर्धेचे उद्‌घाटन पुणे जिल्हा परिषद बाबुराव वायकर, मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपनगराध्यक्ष सुनील शेळके म्हणाले की, सध्याच्या संगणक व मोबाईल युगात मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असून, त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी वडगाव ट्रॅकर्सने खेळाडू व शौकीनांना संधी उपलब्ध केली आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ काळाची गरज आहे. युवकांनी मैदानी खेळाचा छंद जोपासल्यास आजारापासून दूर राहतील. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळून खेळाचा आनंद वृद्धिंगत केल्यास खरा आनंद प्राप्त होतो.

-Ads-

या वेळ उद्योजक श्रीकांत वायकर, गणेश वायकर, सुनील म्हाळसकर, महेश ढमाले, अनंता कुडे, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नेपाळ आदी परिसरातील 22 हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला. या वेळी मावळ तालुक्‍यातील हॉलीबॉल खेळाडू तसेच शौकीनांनी तुफान गर्दी केली होती.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या हॉलीबॉल संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस 33,333 रोख रुपये चषक आलमदेवी ए (मुंबई) हॉलीबॉल संघाला, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 22,222 रोख रुपये चषक अक्षय वायकर स्पोर्टस्‌ फाउंडेशन (वडगाव, मावळ) हॉलीबॉल संघाला तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस 11,111 रोख रुपये चषक आलमदेवी बी (मुंबई) हॉलीबॉल संघाला आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 7,777 रोख रुपये चषक दिनेश ढोरे स्पोर्टस्‌ फाउंडेशन (वडगाव) हॉलीबॉल संघाला देण्यात आले.

या स्पर्धेचे मुख्य आयोजन उद्योजक श्रीकांत वायकर, गणेश वायकर, सुनील म्हाळसकर, महेश ढमाले व सिद्धेश ढोरे आदींनी केले. स्पर्धेचे संयोजन सागर ढोरे, राजु मोरे, मयुर काळोखे, सोनु पिंजण, लखन आंबेकर, रोहित गिरमे, भाऊ ढोरे, प्रमोद नवघणे व वडगाव ट्रॅकर्सच्या वतीने करण्यात आले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)