राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी विघ्नहरच्या विद्यार्थिनींची निवड

ओझर- पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझरचे 14 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी किरण अविनाश भोर आणि आदिती बाळासाहेब शेळके या दोन्ही विद्यार्थिनींनी यशस्वी होत सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तर कॅरम स्पर्धेतील सहभाग निश्‍चित केला असल्याचे मुख्याध्यापक विलास दांगट यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्पर्धांमध्ये या विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटात किरण अविनाश भोर आणि 19 वर्षे वयोगटामध्ये आदिती बाळासाहेब शेळके या विद्यार्थिनींनी यश मिळवत राज्यस्तर स्पर्धेत निवड निश्‍चित केली आहे. या विद्यार्थिनींना गणेश राऊत यांनी मार्गदर्शन केले होते. या सर्वांचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, सरपंच, उपसरपंच, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुरून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)