राज्यस्तरीय कुस्तीत आयुषने पटकावले कास्य पदक

चाफळ, दि. 29 (वार्ताहर) – क्रीडा व युवक संचालनालयामार्फत पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ तालीम संघाचा मल्ल पै. आयुष रामचंद्र साळुंखे याने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवत कास्य पदक पटकावले.
कै. रमेशजी दामले यांच्या जयंती निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत आयुष याने 10 वर्ष वयोगटातील 30 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत कास्य पदक पटकावले आहे. पै.आयुषला सर्व वस्तादांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबदल पै. आयुषचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)