राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये “पीजी’च्या विद्यार्थ्यांचे यश

वासुंदे- बोरीपार्धी चौफुला (ता. दौंड) येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पी जी इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धा मंगळवारी (दि. 19) झाल्या. स्पर्धेत लहान गटात अदिती लवांड, सोहम जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात अनुष्का जांबले हिने प्रथम क्रमांक मिळविला. साहिल नाचणं, वेदांत भोसले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धांचे आयोजन साई मल्हार शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धांमध्ये पुण्यासह लातूर, सातारा, कोल्हापूर, परभणी, औरंगाबादसह इतर भागांतील एकूण 500 खेळाडू सहभागी होते. या यशस्वी कराटे खेळाडूंना प्रा. कैलास महानोर, प्रा. राहुल खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे अभिनंदन संथेचे अध्यक्ष परशुराम गुंजाळ, सचिव रेणुका माने यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)