राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी 48 संघांची निवड

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतील 170 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी 48 संघांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात 15 ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहे.

विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सर्व सहा विद्याशाखांमधील नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात अनेक प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधून घेतले. या एकदिवसीय स्पर्धेचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आविष्कार नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मोहन वामन, उपकुलसचिव एम. व्ही. रासवे आदी उपस्थित होते.

विद्यापीठाला “रुसा’ योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 15 कोटी रुपये रिसर्च पार्कसाठी आहेत. या रिसर्च पार्कचे उद्‌घाटन येत्या 15 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटली होणार आहे. “आविष्कार’ मधून येणाऱ्या नावीन्यपूर्ण कल्पना या रिसर्च पार्कशी जोडून नवनवे उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, आविष्कारच्या आधीच्या व्यवस्थेत सर्व कल्पना पुढे येत नव्हत्या. आता मात्र, प्रत्येक कल्पना विद्यापीठापर्यंत पोहोचत आहेत. ज्या कल्पना राज्यस्तरासाठी पुढे जाऊ शकल्या नाहीत, पण ज्यांच्यात क्षमता आहेत त्यांनाही विद्यापीठातर्फे पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)