राज्यसरकारचा फॉर्म्युला शिक्षकांच्या अंगलट!

नगर – केंद्र शासनाच्या कायद्यानुसार दर 1 किलोमीटर परिसरात शाळा असली पाहिजे. परंतु, राज्य सरकारचा शाळा बंद करण्याचा फॉर्म्यला शिक्षकांच्या अंगलट येत आहे. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीमार करून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांना नाहक त्रास देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रदेश सदस्या तथा कॉंग्रेसच्या प्रदेश सदस्या शिल्पाताई दुसुंगे, डॉ. विलास पाटील, भागचंद औताडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महाराष्ट्र शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने नुकतीच शिक्षणातील बाजारीकरणावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. पुढे बोलताना माजी केंद्रीयमंत्री नवल पाटील म्हणाले, महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था आज कठीण परिस्थितीतून जात आहे. विद्यार्थ्यांना दम देणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात दिलीप वळसे, वसंतराव पुरके यांच्यासारख्या शिक्षणमंत्र्यांना शैक्षणिक पार्श्‍वभूमी होती. केंद्राचा शिक्षणाचा अधिकार कायदा यशस्वीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे आहे. याबाबत लवकरच पुणे येथे होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ, कला शिक्षक संघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ, खासगी प्राथमिक शिक्षक संघ, आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना, म. रा.अंगणवाडीसेविका संघटना, अशा साधारणत: 19 ते 20 संघटना सहभागी होणार असून, शासनाच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आंदालनाची दिशा ठरणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)