राज्यसरकारचा इंधन दर कमी करण्याचा निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी ! -नवाब मलिक

व्हॅट कमी करायचा असल्यास शासनाने दारू वरचा अतिरिक्त कर आणि दुष्काळावरचा करही कमी करून दाखवावा

मुंबई: देशभरामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढीस लागलेले पेट्रोल व डिझेलचे भाव अखेर आज केंद्र सरकारद्वारे २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त करत दिलासा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

-Ads-

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ” पेट्रोल-डिझेलवरील विशेष उत्पादन शुल्क दीड रूपयाने कमी करण्याचा आणि पेट्रोल-डिझेल अडीच रूपयाने स्वस्त करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. पण या निर्णयाने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

नवाब मलिक म्हणाले, “आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर ९ रुपये असलेली एक्साईज ड्युटी वाढवून या सरकारने १९.४८ केली, डिझेलवरील ३ रूपये असेलली एक्साईज ड्युटी वाढवून १५.३३ केली. सरकारला जनतेला दिलासा द्यायचा असल्यास आघाडी सरकारच्या काळातील एक्साईज ड्युटीचे दर पुन्हा लागू करावेत, असे आमचे आव्हान आहे. केंद्र सरकार पाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट २.५० रुपयाने कमी करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केलाय. राज्यसरकारचा हा निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असून व्हॅट कमी करायचा असल्यास शासनाने दारू वरचा अतिरिक्त कर आणि दुष्काळावरचा करही कमी करून दाखवावा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)