नवी दिल्ली – राज्यसभेतील सदस्यांना आता आणखी पाच भाषेतून बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व अनुसचित 22 भाषांमधून राज्यसभेत बोलण्याची संधी सदस्यांना मिळणार आहे. संसदेच्या 18 जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात डोगरी, काश्‍मीरी, कोकणी, संथाली आणि िंसंधी या भाषांचे इंटरप्रिटर्स संसदेने उपलब्ध करून दिले आहेत.

लोकसभेसाठीही आता बोडो, मैथिली, मणिपुरी, मराठी आणि नेपाळी भाषेचे भाषांतरकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य घटनेत ज्या 22 अधिसूचीत भाषा आहेत त्या सर्व भाषांचा वापर आता संसदीय कामकाजात करता येणार आहे.

तथापी सुरूवातीच्या टप्प्यात कोणत्याहीं सदस्याला यापैकी एका भाषेचा वापर करून संसदेत आपले मत मांडायचे असेल तर त्याने आधी पुरेशा अवधीची नोटीस संसदेच्या सचिवालयाला देणे आवश्‍यक आहे त्यानुसार त्यांना इंटरपीटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयाबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)