राज्यसभेच्या जागांसाठी 6 राज्यांमध्ये आज मतदान

नवी दिल्ली – राज्यसभेतील रिक्‍त 25 जागांसाठी 6 राज्यांमध्ये आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे मताधिक्‍य असल्याने तेथून 10 पैकी 8 जागा निवडून आणणे भाजपाला शक्‍य होणार आहे. सपा आणि बसपामध्ये तडजोड झाल्यास यापेक्षा अधिक जागा निवडून आणणे भाजपाला अवघड असणार आहे. मात्र यापेक्षाही अधिक जागा निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

राज्यसभेमध्ये एकूण 58 रिक्‍त जागा भरायच्या होत्या. त्यापैकी 10 राज्यातील 33 जागांवरील उमेदवार 15 मार्च रोजी बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये रवि शंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह 7 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेशातून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर तासाभरातच मतमोजणीही होणार आहे. केरळमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूकही होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)