राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी गुरुवारी मतदान

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी म्हणजे नऊ ऑगस्टला होईल, अशी माहिती सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली. सरकार आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

विरोधकांकडून अजून कोणत्याही नावावर सहमती झालेली नाही. तर एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. विरोधकांकडून तृणमूल कॉंग्रेसचा उमेदवार दिला जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र टीएमसीने यासाठी नकार दिला. त्यानंतर आता कुणाला संधी दिली जाते, त्याकडे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला मतदान होणार आहे. यासाठी 8 ऑगस्टच्या दुपारपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे.

-Ads-

राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत. त्यापैकी 115 जागा एनडीएकडे, तर यूपीएकडे 113 जागा आहेत. तसेच अन्य पक्षांचे 16 जागा असून 1 जागा रिक्‍त आहे. विरोधकांपैकी कॉंग्रेसच असा पक्ष आहे ज्यांचे राज्यसभेत सर्वाधिक खासदार आहेत. उपसभापतीपदी असलेले पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ 2 जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे आता हे पद रिक्त झाल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येते आहे. कॉंग्रेसमध्ये नसलेल्या उमेदवारालाही पाठिंबा द्यायची तयारी कॉंग्रेसने दर्शवली आहे, असे समजते. आता कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार ते बुधवारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)