राज्यसभा निवडणूक ; बसपला मोठा धक्का, मते फुटल्याने आंबेडकरांची जागा धोक्यात

लखनऊ: उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला मोठा झटका बसला आहे. कारण बसपाच्या एका उमेदवाराने भाजपच्या बाजूने मत टाकल्याने बसपा उमेदवार भीमराव आंबेडकर यांची जागा धोक्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात दहा जागांसाठी लढत सुरू आहे. भाजपने अरुण जेटली, अशोक वाजपेयी, विजय पाल सिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता करदम, अनिल जैन, हरनाथ सिंह यादव आणि जीव्हीएल नरसिम्हा राव या आठ उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. तर समाजवादी पार्टीने अभिनेत्री जया बच्चन आणि बसपाने भीमराव आंबेडकर यांना तिकीट दिले आहे. मात्र अनिल अग्रवाल या अकराव्या अपक्ष उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिल्याने उत्तर प्रदेशातील राज्यसभेची निवडणूक चुरशीची होत आहे.

भाजप आघाडीकडे ३२४ आमदार आहेत. त्यांचे आठही उमेदवार निवडून येतील एवढी मतांची बेगमी भाजपकडे आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ३७ मतांची गरज आहे. सपाकडे ४७ मते असल्याने जया बच्चन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सपाची उरलेली दहा मते बसपा उमेदवाराला मिळणार असून काँग्रेसची ७ मतेही बसपाला मिळणार आहेत. त्यामुळे बसपाकडे एकूण ३६ मतांची जुळवाजुळव झालेली असतानाच बसपाचे आमदार अनिल सिंह यांनी भाजपला मतदान केल्याचे उघड सांगितल्याने बसपाच्या उमेदवाराची सीट धोक्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)