राज्यसभा निवडणूकः युपीमध्ये ‘कमळ’ फुलले, 9 उमेदवार विजयी

नवी दिल्ली – राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकाचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या 10 जागांच्या निवडणुकीत 9 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर दहाव्या जागेवर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन 38 मतांनी विजयी झाल्या आहेत.

यूपीमध्ये भाजपचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या भीमराव आंबेडकर यांचा पराभव केला. अरुण जेटली, अनिल जैन, व्हीपीएस तोमर, अशोक बाजपेयी, एस डी राजभर, जीव्हीएल नरसिम्हा राव, कांता करदम, एच एस यादव यांनी उत्तर प्रदेशात विजय मिळवला. विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यूपीशिवाय पश्‍चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात कॉंग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांत 33 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली. येथून भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, कॉंग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

बिनविरोध निवडणूक

आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे.

बिहारमध्ये सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.

छत्तीसगडमध्ये एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपचे सरोज पांडे बिनविरोध निवडून आले.

गुजरातमध्ये गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन कॉंग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत.

हरियाणातही भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्‍टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली.

उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.

ओडिशामध्ये तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले.

मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

हिमाचल प्रदेशात एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)