राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक : शिवसेना अखेर एनडीए बरोबरच

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराचा मार्ग सुकर झाला आहे. या निवडणुकीत हरिवंश नारायण सिंह हे एनडीएचे उमेदवार आहेत.

आम्ही एनडीए उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत अशी माहिती सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत बातमीदारांना दिली. मोदी सरकारवरील अविश्‍वास ठरावाच्यावेळी शिवसेनेने मोदी सरकारला पाठिंबा न देता या मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना काय करणार हे महत्वाचे होते. कारण एनडीएकडे ही निवडणुक जिंकण्यासाठी आवश्‍यक असणारे 123 चे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेचे राज्यसभेत तीन सदस्य आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)