राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी विरोधकांतर्फे वंदना चव्हाण

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांची उमेदवारी निश्‍चीत करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीने संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये सध्या चुरस निर्माण झाली आहे. 57 वर्षीय वंदना चव्हाण या पुण्याच्या माजी महापौर असून त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या निवडणुकीविषयी मोठे औत्स्युक्‍य आहे.

येत्या गुरूवारी ही निवडणूक होणार आहे. विरोधकांकडे सध्या एकूण 119 मतदार आहेत. 245 सदस्यांच्या सभागृहात विजयासाठी 123 मतांची आवश्‍यकता आहे. वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीला आम आदमी पार्टी, तेलगु देसम, वायएसआर कॉंग्रेस, पीडीपी आणि डीएमके या पक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजप पुरस्कृत उमेदवाराला अकाली दल, तेलंगणा राष्ट्रीय समिती, अद्रमुक या पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो.

-Ads-

तथापी त्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना बरेच झगडावे लागणार आहे. सकाळी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग, भाजप अध्यक्ष अमित शहा या नेत्यांनी राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी चर्चा केली.

अकालीदलाची नाराजी
भाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेला अकाली दलाने या निवडणुकीसाठी नरेश गुजराल यांना उभे करण्याचे ठरवले होते. सुरूवातीला भाजपने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबाही दर्शवला होता परंतु नंतर मात्र त्यांनी त्यांच्या ऐवजी संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे अकाली दल नाराज झाला आहे. त्यांनी या निवडणुकावर बहिष्कार घालण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. त्यामुळे ही नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)