राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ एनडीएचे पारडे जड

नवी दिल्ली – चुरशीच्या मानल्या जात असलेल्या राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीएचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. भाजपने तर एनडीएचे उमेदवार हरीवंशनारायण सिंह यांचा सहजसुलभ विजय होईल, असा दावा केला आहे.

राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या (गुरूवार) मतदान होईल. त्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक सज्ज झाले आहेत. राज्यसभेत एनडीएकडे स्पष्ट बहुमत नसल्याने निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातून कॉंग्रेसचे बी.के.हरिप्रसाद यांच्या रूपाने विरोधकांनी संयुक्त उमेदवार दिला आहे. त्यांची थेट लढत एनडीएचे उमेदवार आणि जेडीयूचे सदस्य हरीवंश यांच्याशी होईल. राज्यसभेचे एकूण संख्याबळ 244 इतके आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपाध्यक्ष बनण्यासाठी उमेदवाराला 123 सदस्यांचा पाठिंबा मिळवणे आवश्‍यक आहे. यापार्श्‍वभूमीवर, हरीवंश यांना 126 सदस्यांचा पाठिंबा मिळेल, असा दावा भाजपच्या सुत्रांकडून करण्यात आला आहे. विरोधकांचे उमेदवार हरीप्रसाद यांना पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या 111 च्या वर जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या गणितानुसार हरीवंश यांच्या पाठिशी एनडीएचे सर्व 91 सदस्य उभे राहतील. समाजवादी पक्षापासून दुरावलेले अमर सिंह आणि 3 नामनियुक्त सदस्यांचा त्यांना पाठिंबा मिळेल. याशिवाय, एनडीएमध्ये नसलेल्या अण्णाद्रमुक (13 सदस्य), तेलंगण राष्ट्र समिती (6), वायएसआर कॉंग्रेस (2), भारतीय राष्ट्रीय लोकदल (1) आणि बिजद (9) हे पक्षही हरीवंश यांच्या बाजूने मतदान करतील, असे भाजपचे म्हणणे आहे. द्रमुकचे प्रमुख एम. करूणानिधी यांच्या निधनामुळे त्या पक्षाचे 4 सदस्य मतदानात सहभागी होण्याची शक्‍यता कमी आहे. याशिवाय, 3 सदस्य असणाऱ्या आपने कुणाच्या बाजूने मतदान करणार याबाबतची भूमिका अजून जाहीर केलेली नाही. याबाबी विरोधकांचे उमेदवार हरीप्रसाद यांच्यासाठी प्रतिकूल ठरणाऱ्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)