राज्यसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

कपिल सिब्बल यांची जोरदार टीका


अभूतपूर्व, बेकायदेशीर आणि घाईचा निर्णय 

नवी दिल्ली – सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठीची नोटीस फेटाळूण्याची राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांच्या कृतीवर कॉंग्रेस पक्षाने जोरदार टीका केली आहे. जनतेचा विश्‍वास गमावणाऱ्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची कृती अभूतपूर्व, बेकायदेशीर, चुकीच्या सल्ल्यावर आधारीत आणि अत्यंत घाईघाईने करण्यात आलेली आहे. पूर्ण चौकशी न करता महाभियोगाची नोटीस फेटाळण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे सिब्बल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

-Ads-

देशाच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही आमदारांनी दिलेली नोटीस इतक्‍या प्राथमिक अवस्थेमध्येच फेटाळण्यात आली नव्हती, यावर सिब्बल यांनी विशेष भर दिला. नायडू यांच्या निर्णयामुळे नागरिकांचा विश्‍वासघात झाला असून कायदेशीर यंत्रणाही धोक्‍यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सरन्यायाधीशांद्वारे केली जाणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. असेही सिब्बल यांनी सांगितले.

तत्पूर्वी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे माध्यम प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनीही उपराष्ट्रपतींच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. लोकशाही नाकारणारे आणि लोकशाही वाचवणाऱ्या आवाजांमधील हा संघर्ष आहे, असे ते म्हणाले होते. राज्यसभेमध्ये 64 खासदारांनी महाभियोगाची नोटीस दिल्याच्या काही तासातच राज्यसभा नेते अरुण जेटली यांनी “बदल्याची याचिका’ अशी या नोटीशीची पूर्वग्रहदूषित संभावना केली होती. त्यातूनच राज्यसभा अध्यक्षांना या नोटीशीचे काय करायचे हे सूचित केले गेले होते.

कॉंग्रेस प्रवक्‍ते आणि विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्‌विटरवरून नायडू यांच्या निर्णयावर टीका केली. दिल्लीला परत आल्यानंतर लगेचच नायडू हे महाभियोगाबाबतची नोटीस फेटाळणार हे अपेक्षितच होती. असे सिंघवी यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)