राज्यशासनाचा केवळ शब्दांचा खेळ

दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर : पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांचा समावेश

पुणे – केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शब्दांचा खेळ करण्यात पटाईत झाले आहे. कारण, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर अनेक ठिकाणी खरीप हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला जावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. तर सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्‍टोबरचा मुहूर्त शोधला होता; परंतु सरकारच्या कारभारावर सर्वच राजकीय पक्षांसह शेतकरी संतप्त झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांना लक्षात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा शब्दांचा “मायाजाल’ फेकत राज्यातील 180 तालुक्‍यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आम्ही शेतकऱ्यांसमवेत असल्याचे “गाजर’ दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या दुष्काळ सदृश यादीत पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला असला, तरी ज्या तालुक्‍यांत खरोखरच दुष्काळी परिस्थिती आहे त्या तालुक्‍यांचे नावे वगळविण्यात आल्याने आता “दुष्काळ सदृश’ शब्दांवरून विरोधक राज्य शासनाला घेणार असल्याची ढग गडद झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाल आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वीच राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरावर प्राथमिक दुष्काळी अहवाल तयार करण्यात आला होता. अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांचा समावेश आहे. या तालुक्‍यांमध्ये यंदा पाऊसमान कमी झाले आहे. त्यात सर्वांत कमी पाऊस शिरुर आणि दौंड तालुक्‍यात पडला आहे. या दोन्ही तालुक्‍यात सरासरीच्या 58 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्या खालोखाल बारामती तालुक्‍यात सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस पडला आहे. तर इंदापूरमध्ये 42.24 टक्के कमी पाऊस झाला आहे. वेल्हे आणि पुरंदरमध्ये अनुक्रमे 34 आणि 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. हवेलीमध्ये 31 टक्के कमी तर आंबेगावमध्ये 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. याशिवाय भोर तालुक्‍याच्या काहीच भागात कमी पाऊस झालेला आहे. तर मुळशी तालुक्‍यातील फक्‍त पौडमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

जिल्ह्यातील ही 10 तालुके
आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मूळशी, पुरंदर, शिरुर, वेल्हे या 10 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)