राज्यभरात थंडीची चाहूल

पुण्यातही तापमान घसरणीकडे

पुणे – ऑक्‍टोबर संपत आला असताना आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. परभणी येथे राज्यातील सर्वांत कमी म्हणजे 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या पाच वर्षांतील ऑक्‍टोबरमध्ये सर्वांत कमी तापमान परभणीत नोंदविले गेले आहे. राज्यात ऑक्‍टोबरच्या सुरूवातीपासून उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्या पुढे असून, नगरमध्ये उच्चांकी 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. तर उर्वरित राज्यांत दिवसाच्या तापमानातही घट होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकणाचा अपवाद वगळता राज्यात सर्वच ठिकाणी रात्रीचे तापमान कमी होत आहे. किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या वेळी गारठाही वाढू लागला आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी घट होणार असून निरभ्र आकाशासह मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)