राज्यभरात थंडीचा कडाका; नगर येथे नीचांक

पुण्यात 11.3 अंश सेल्सिअस तापमान

पुणे – राज्याच्या तापमानात मोठी घट झाल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली घसरायला लागला आहे. विदर्भापाठोपाठ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. नगर येथे तापमान 10 अंशांवर आल्याने गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.

-Ads-

नाशिक, नागपूर, गोंदिया येथेही गारठा चांगलाच वाढला आहे. राज्याच्या तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुण्यात ही आज तापमान 11 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीने हुडहुडी वाढविली आहे. पूर्व मध्य प्रदेशातील मांडला येथे तापमानाचा पारा सातत्याने पाच अंशांच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. राज्यातही विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. नगर, नाशिक, सांगली, सातारा, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे.

पुण्यातही तापमान सरासरीपेक्षा 1.3 अंश सेल्सिअस ने कमी झाले आहे. पुण्यातील तापमान हे 11.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात आगामी काळात तापमान आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)