राज्यभरात चार कोटी बांबू लागवड

वनमहोत्सव : वनमंत्र्यांची ट्विटर हॅन्डलवरून माहिती

पुणे – बांबूची उपयुक्तता लक्षात घेत, यंदा राज्यात तब्बल चार कोटी बांबू लागवडीचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे. वनमहोत्सवांतर्गत हा उपक्रम होणार आहे.

वन विभागातर्फे गेली तीन वर्षे आयोजित वनमहोत्सवांतर्गत राज्यभर वृक्षांची लागवड केली जाते. दर वर्षी विशिष्ट संख्येत झाडे लावत जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे. यंदा महोत्सवांतर्गत 33 कोटी वृक्षगलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून याअंतर्गत चार कोटी बांबूची लागवड केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून दिली. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट उद्दिष्ट दिले जाणार आहे.

पुणे वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, “यंदा वृक्ष लागवडीसाठी बांबूला प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषत: पश्‍चिम घाटात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी जागांची पाहणी केली जात असून त्यानंतर कोणत्या ठिकाणी किती लागवड करता येईल, याचा अहवाल तयार करून त्यानुसार उद्दिष्ट ठरविले जाणार आहे.’

शहरी भागात बांबूचे बेट
बांबू ही कमी पाण्यात तग धरून राहणारी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी आणि आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर वनस्पती असल्याने बांबू लागवडीला प्राध्यान्य दिले जाणार आहे. तसेच शहरात काही ठिकाणी बांबूची बेटेदेखील तयार करण्याच्या प्रस्ताव असल्याचे समाजिक वनिकरण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)