राज्यपालांचा पुण्यातील चहापान कार्यक्रम रद्द

मुंबई – दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला पुणे येथील राजभवनातील आयोजित केला जाणारा राज्यपालांचा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा यांचा मृत्यू झाला. या दुःखद पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी पुणे येथील राजभवनातील 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी आयोजित केलेला चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजभवनातून जाहीर करण्यात आले.

मात्र, त्यादिवशी सकाळी 9 वाजता कौन्सिल हॉल येथे राज्यपालांच्या हस्ते होणारा झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)