राज्यकर्त्यांचा मराठा समाजाला एकाकी पडण्याचा प्रयत्न – शरद पवार

मुंबई: राज्यातील औद्योगिक क्षेत्रास मराठा आरक्षण आंदोलनाची झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल. म्हणूनच मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार म्हणाले, “आरक्षणाच्या मागणीच्या पूर्तते संदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे. यापुढे आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात लागणारा वेळ, राज्यशासन व विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी मराठा समाजाने शांतता राखावी. “
पवार पुढे म्हणाले, “राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे, त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही यांची खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)