राजेश शृंगारपुरेच्या आयुष्यात नक्की काय गडबड झाली..?

भारदस्त आवाज, मजबूत शरीरयष्टी आणि दिसायला पण छान असलेला शिवाय बिग बॉस मराठी मधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे राजेश शृंगारपुरे. याच अभिनेत्याच्या आयुष्यात सध्या खूप गडबड झाली आहे.. अहो खरंच.. पण बिग बॉसची नव्हे, ही वेगळीच गडबड आहे. ‘गडबड झाली’ नावाचा त्यांचा नवीन सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. यात राजेश शृंगारपुरे यांची मुख्य नायकाची भूमिका आहे.

सिनेमाबद्दल राजेश सांगतात की, चित्रपटात उषा नाडकर्णी माझी आजी आहे, आणि ही आजी तशी खूपच हट्टी आहे.. सध्या तिने माझ्या लग्नाचा हट्ट धरला आहे. तिची इच्छा आहे की, मरण्याआधी त्यांना त्यांच्या सुनेचं तोंड बघायचं आहे. त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न सुरू असतात. खरंतर आजीमुळे मला लग्न करावं लागतं..कसंबसं लग्न होतं.. पण लग्नाच्या वेळी अशी काहीतरी गडबड होते की संपूर्ण गोष्टच बदलून जाते. नंतर सिनेमात विकासचं काय होतं. अशी गडबड गोंधळने परिपूर्ण आणि मज्जा मस्ती असलेला सिनेमा म्हणजे ‘गडबड झाली’.

या सिनेमाचे शूट चालू असताना घडलेला एक किस्सा राजेश शृंगारपुरे यांनी सांगितला, पालघरला शूटसाठी जात असताना अचानक त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर झोपून गेला, विशेष म्हणजे कोणाचच लक्ष नव्हतं आणि मध्येच जोरात हॉर्न वाजला तेव्हा सगळ्यांच्या ही बाब लक्षात आली… आणि मग त्या नंतर त्या ड्रायव्हरला चहा-पाणी देऊन त्याची झोप घालवली आणि नंतर विकास पाटील यानेच पूर्ण गाडी चालवली… असे मजेदार किस्से आणि मज्जा करत करत या सिनेमाचे शूट पूर्ण झाले. तर असा हा सिनेमा १ जूनला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, संतराम दिग्दर्शित या सिनेमात राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)