राजेश खन्ना एक ‘सिनेतारा’…

हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. राजेश खन्ना यांनी 1966 साली ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1967 साली भारतातून ‘आखरी खत’ या चित्रपटाची ‘बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. या चित्रपटानंतर राजेश खन्ना हे नाव त्या काळी देशभर चर्चेचा विषय ठरला होता.

एकापोठोपाठ सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. 1969 साली प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे नाव घराघरात पोहोचले. आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना तर आवडलाच पण देशाला या चित्रपटामुळे पहिला सुपरस्टार मिळाला. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत त्यांची यात भूमिका होती. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले.

राजेश खन्ना यांचे मूळ नाव होते जतीन खन्ना. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांना राजेश खन्ना या नावाने लोक ओळखत. हेच नाव त्यांनी कायम ठेवले. राजेश खन्ना यांनी 1969 ते 1972 या काळात त्यांनी लागोपाठ 15 सुपरहिट सिनेमे दिले. राजेश खन्ना यांनी 18 जुलै 2012 रोजी जगाचा निरोप घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)