राजेश खन्नाचे रेकॉर्ड सलमान मोडणार

हिंदी सिनेमामध्ये हिरो म्हणून एकापाठोपाठ एक 15 हिट सिनेमे देण्याचे रेकॉर्ड राजेश खन्नाच्या नावावर आहे. हे रेकॉर्ड मोडण्यासाठी सलमान खानची जोरात घोडदौड सुरू आहे. राजेश खन्नानंतर कितीतरी सुपरस्टार आले. पण त्यापैकी कोणालाही हे रेकॉर्ड मोडणे शक्‍य झाले नाही. अगदी अमिताभ बच्चन यांनाही हे रेकॉर्ड मोडता आलेले नाही. 1969 ते 1972 च्या मध्यापर्यंत राजेश खन्नांनी लागोपाठ हिरो म्हणून 15 हिट सिनेमे दिले होते.

सलमानची प्रगती पाहता 2019 मध्ये तो हे रेकॉर्ड मोडू शकेल, अशी शक्‍यता आहे. 2017 पर्यंत सलमानच्या नावावर हिरो म्हणून 10 सुपरहिट सिनेमे जमा होते. त्यामध्ये “टायगर जिंदा है’ आणि “”ट्युबलाईट’ची गणती केली तर 12 सिनेमे झाले. आता “भारत’ आणि नंतर “किक’ रिलीज झाल्यावर त्याच्या हिट सिनेमांची संख्या होईल 14. म्हणजे एखादा सिनेमा झाला की तो राजेश खन्नांचे रेकॉर्ड मोडू शकेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सलमानला त्याच्या करिअरमध्ये फ्लॉप सिनेमेही मिळाले आहेत. 2000 च्या दशकात त्याच्या नावावर फ्लॉप सिनेमे अनेक होते. “वॉन्टेड’च्या पूर्वी त्याचे 29 सिनेमे अंशतः फ्लॉप झाले होते. त्यामध्ये “मेरी गोल्ड’, “सलाम ए इश्‍क’, “मिसेस खन्ना’, “जानेमन’ यासारखे सिनेमे होते. मात्र “वॉन्टेड’नंतर त्याने मागे वळून बघितलेले नाही. एक “ट्‌ग्युबलाईट’चा अपवाद वगळला तर त्याला सलग हिट सिनेमेच मिळाले आहेत. “दबंग’नंतर सलूची इमेज पुन्हा त्याच्या चाहत्यांच्या मनात उंचावली. त्याची ऍक्‍शन स्टाईल, रोमान्स, डान्स सगळेच काही और आहे. त्याचे सिनेमे 100, 200, 300 कोटींच्या घरात जाऊन पोहोचले.

पण सलमानला काकांचे रेकॉर्ड मोडण्यात इंटरेस्ट नाही. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शम्मी कपूर, देव आनंद यांच्यासारख्या हिरोंच्या आसपासही आपण पोहोचू शकत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. इतकेच काय कुमार गौरवसारख्या अभिनेत्याच्या क्षमतेच्या 10 टक्केही आपली पात्रता नाही, असे त्याचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)