राजेश काळे यांची मलकापूरला बदली

सातारा – सातारा पालिकेचे शॅडो मुख्याधिकारी व सभासचिव राजेश काळे यांची मलकापूर नगरपंचायतीत बदली झाली आहे. तर वाई पालिकेतून प्रशांत खटावकर यांची सातारा पालिकेत वर्णी लागली आहे. खटावकर यांनी सोमवारीच रुजू रिपोर्ट देत मुख्याधिकारी शंकर गोरे यांना कामावर हजर झाल्याचा दाखलाच दिला.

राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे फर्मान नगरविकास आघाडीने सोमवारी काढल्यानंतर सातारा जिल्हयात 34 कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंर्तगत बदल्या झाल्या. केवळ तीन कर्मचारी रोटेशनमुळे जिल्ह्याबाहेर बदलून गेले. सातारा पालिकेत रंजना भोसले, हिमाली कुलकर्णी यांची महिन्याभरापूर्वीच सातारा पालिकेत बदली झाली. तर प्रशासन अधिकारी अरविंद दामले यांची श्रेणीत पदोन्नती झाली. सभासचिव राजेश काळे यांची मलकापूर नगरपंचायतीत बदली झाली आहे. सभासचिव पदावर काळे गेल्या अकरा महिन्यापासून काम करत होते. सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधी पक्ष भाजप व

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर विकास आघाडी यांच्याशी त्यांनी उत्तम संबंध राखले होते. तर मुख्याधिकारी गोरे यांच्या अनुपस्थितीत काळे यांनी पालिकेचा कारभार एकहाती सांभाळला होता. काळे यांच्या बदलीने गोरेंची मात्र गोची झाली आहे. त्यामुळे सभासचिव पदाची जवाबदारी कोणाला दिली जाणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)