राजेशाही द्या, दहा वर्षात दहशतवाद संपवू

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनी खा.उदयनराजेचे प्रतिपादन

मेढा, दि. 26 (प्रतिनिधी) – शहीद तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम अतुलनीय आहे. पोलिसांनी तुकाराम ओंबळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आपले कार्य करावे. महाराष्ट्र आणि मुंबई अजूनही असुरक्षित आहे. फक्त दहा वर्षे राजेशाही दिलीत तर बलात्कारी आणि दहशतवाद्याचा मुळापासून नायनाट करू असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात जीवाची पर्वा न करता केवळ हातात काठी घेऊन तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबवर झडप घालून त्याला जिवंत पकडले होते. कसाबने केलेल्या गोळीबारात ओंबळे शहीद झाले. त्यांच्या पराक्रमाला आज 10 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांच्या मूळ गावी केडांबे, ता. जावळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले बोलत होते.

दरम्यान, शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे, मेढा पोलिस स्टेशनचे सपोनि. जीवन माने, सुनील काटकर, एकनाथ ओंबळे, अमितदादा कदम, एस. एस. पारटे गुरुजी, सचिन जवळ अन्य मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामस्थांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा जागेबाबत सतत दुर्लक्ष न होता ते लवकरच पूर्ण व्हावे, अशी विनंती खा. उदयनराजे यांच्याकडे केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)