राजेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी भागातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने “स्वच्छ गाव स्वच्छ तालुका’ उपक्रमाअंतर्गत गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन यांनी भेट दिली असता शाळेत राबवलेले उपक्रम पाहून समाधान व्यक्‍त केले. राजेवाडी शाळा आदिवासी भागातील प्रगत शाळा म्हणून ओळखली जाते.शालेय परिसरात केलेले वृक्षारोपण, व्हरांडा, ज्ञानरचनावादी, शैक्षणिक उपक्रमांचे महाजन यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रत्येक विषयाच्या प्रश्‍नपेढ्या तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. 100 टक्के विद्यार्थी सकाळी 9 वाजता शाळेत उपस्थित राहतात. इंग्रजी विषयाची विशेष तयारी करुन घेतली जाते.असे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रप्रमुख निर्गुन प्रदान, मुख्याध्यापक यमना साबळे, लहु घोडेकर, एकनाथ मदगे व संदीप माळी हे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)