राजेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी दुर्गम भागातील राजेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन गणवेश याप्रमाणे 39 विद्यार्थ्यांना 23 हजार 400 रुपयांचे शालेय गणवेशाचे वाटप राजेवाडी गावचे सरपंच महंत बेलनाथ महाराज, पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख रंजना चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ साबळे, सदस्य राजाराम आसवले, मुख्याध्यापक यमना साबळे, संदीप माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अडीच लाख रुपये खर्चातून शाळेसाठी शालेय बाग तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी दहा टॅब देण्याचे मान्य केलेले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब होतकरू आणि वंचित घटकांना शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे होत असते. मोफत आणि सक्तीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून होते ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्‌गार सरपंच बेलनाथ महाराज यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू घोडेकर यांनी केले, तर आभार एकनाथ मदगे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)