मंचर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी (ता. आंबेगाव) येथे ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.य ावेळी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एक मुल पाच झाडे, वृक्ष हेच आपले मित्र, झाडे लावा – झाडे जगवा , वनश्री हीच धनश्री, वृक्ष जगवा – जीवन फुलवा, झाड तेथे पाखरू – धरतीचे लेकरू, झाडाचे रक्षण – आपले संरक्षण… अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन गावातून वृक्षदिंडी काढली. शालेय परिसरामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी शंभर झाडांचे रोपण केले. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक लहू घोडेकर आणि संदीप माळी यांनी वृक्षाचे रक्षण – हेच मूल्य शिक्षण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्ष संगोपनाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक यमनाजी साबळे, एकनाथ मदगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ साबळे, अंगणवाडी सेविका सुजाता शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा