राजेवाडीत शिबीरात 500 जणांची तपासणी

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील राजेवाडी येथील प्राथमिक शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्तआयोगातुन व ट्रायबल डॉक्‍टर्स फोरम महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आदिवासी भागातील सुमारे पाचशे रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.
शिबीराचे उद्‌घाटन मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिक डॉ. सीमा देशमुख यांच्या हस्ते आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे नंदकुमार पोखरकर, डॉ. विलास साबळे, डॉ. विकास साबळे, डॉ नितीन देवमाने, डॉ संतोष सूपे, भीमाशंकर हॉस्पिटलच्या डॉ ऋतुजा घोलप, सरपंच बेलनाथ महाराज, उपसरपंच राजेंद्र शेळके यांच्या उपस्थित करण्यात आले. शिबीरास पंचायत उपसभापती नंदकुमार सोनावले, सदस्या इंदुबाई लोहकरे, बाजार समिती माजी सभापती प्रकाश घोलप, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे व आदिवासी आरोग्य सेवा फाऊंडेशन पुणे, ट्रायबल डॉक्‍टर्स फोरम चे सहकार्य लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)