राजेबागसवार दर्ग्यात चांदीचा “ताज’ केला अर्पण

अकलूज- अकलूज येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजेबागसवार दर्ग्यात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक किलो चांदीचा ताज (मुकुट) अर्पण केला.
येथील विजय चौकात असलेला राजेबागसवार दर्गा अकलूज व माळशिरस तालुक्‍यातील हिंदू -मुस्लिमांचे व इतर धर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून विख्यात आहे. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहितेपाटील या पिता-पुत्रांनी फुलांची चादर वाहून प्रार्थना केली. याप्रसंगी नंदिनीदेवी मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, डॉ. वजीर शेख, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष फातेमा पाटावाला, शंकर कारखान्याच्या देवयानी सालगुडे, तात्या गुळवे, असलम सय्यद, जहांगीर सय्यद, आदम तांबोळी, आदिल शेख, उमर शेख, दादाभाई मोहोळकर, जावेद तांबोळी, सुनील लावंड, जहांगीर तांबोळी, सलीम पठाण, नबीलाल तांबोळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)