राजेगाव- 21 वर्षे भारताच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलात सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रकांत श्रीरंग मेंगावडे यांचा राजेगाव (ता.दौंड) ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मेंगावडे यांचा ग्रामपंचायत राजेगाव, ग्रामस्थ, राजेश्वर विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, राजेश्वर विद्यालय आणि अंगणवाडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भीमा पाटसचे माजी संचालक शहाजीबापू जाधव यांच्या हस्ते मेंगावडे यांचा सत्कार करण्यात आला. 72 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मेंगावडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, राजेश्वर विद्यालय आणि राजनाथ इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करून योग्य सन्मान केला आहे. यावेळी मेंगावडे म्हणाले की, गेली 21 वर्षे प्राण तळहातावर घेऊन भारतमातेसाठी लढलो. याप्रसंगी बलिदान द्यायची वेळ आली असती तरी मागे हटलो नाही. सेवानिवृत्तीनंतर ग्रामस्थांनी जो माझा नागरी सत्कार केला. माझ्या हस्ते सर्वच शाळेत ध्वजारोहण केले ते माझ्यासाठी लाखमोलाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)