राजेगावच्या उपसरपंचपदी संगीता भोसले

राजेगाव – येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार राहुल कुल गटाच्या संगीता जनार्दन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच महेश कडू यांनी इतरांना संधी देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी उद्धव घाडगे यांनी काम पहिले. यावेळी मुकेश गुणवरे, मालोजी मोरे,
मनोज भोसले, शहाजी गुणवरे, नवनाथ लोंढे महादेव बगाडे, चंद्रकांत मोरे आणि उपसरपंचासह नऊ सदस्य उपस्थित होते. राजेगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीमध्ये कुल आणि थोरात या दोन्ही गटांची एकत्रित सत्ता असून, सरपंच थोरात गटाच्या, तर उपसरपंच कुल गटाच्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)