राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांना “लॉटरी’

स्थायी समितीवर संधी : चिंचवड मतदार संघाला झुकते माप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील भाजपच्या दोन नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची महासभेत निवड करण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांनी स्थायीत निवड झाल्याचे जाहीर केले.

-Ads-

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी डावलेल्या नाराजीतून सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामा दिले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या जागी राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे या दोघांची निवड करण्यात आली आहे.

आमदार महेश लांडगे समर्थक जाधव हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्याबरोबरच निष्ठावंत गटाचे शीतल शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तेही इच्छूक होते. परंतु, ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे देऊ केले. परंतु, ते मंजूर केले नव्हते.

स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पडल्यावर महिन्याभरानंतर जाधव यांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केला होता. तर, शीतल शिंदे यांनी गेल्या आठवड्यात स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिंदे यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला होता. त्यामुळे या दोन सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)