राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून एफ आर पी चे तुकडे केले : रघुनाथ पाटील

कोल्हापूर,(प्रतिनिधी): दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून एफ आर पी चे तुकडे पाडल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे आज कोल्हापुरात ऊस दरासंदर्भात पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळून इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

30शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री आणि खासदार राजू शेट्टी यांना टीकेच लक्ष केले. एकीकडे गुजरात पॅटर्न राबवा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या उपस्थितीत एक रकमी एफ आर पी चा कायदा मोडला गेल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकरकमी एफ आर पी 14 दिवसांच्या आत देण्याची व्यवस्था झाली पाहिजे असे देखील त्यांनी म्हटले आहे. या वर्षी ऊसाला 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि मागील एफआरपीचा उर्वरित हप्ता मिळाला नसल्याने 3 नोव्हेंबरला महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी रघुनाथ पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राजू शेट्टी खासदार झाल्या पासून उसाच्या रिकव्हरीचा बेस वाढत गेला आहे. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून 2 वर्षांपूर्वी 80:20 असे एफआरपीचे तुकडे पाडले. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे हडपण्यासाठी राजकीय पक्षांनी राजू शेट्टी यांना उभे केले आहे. अशी टीका रघुनाथ पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)