राजू शेट्टी यांचा खासदारकी वाचविणे हाच अजेंडा- शिवाजीराव माने गटाचा आरोप

‘स्वाभिमानी’ला सोडचिठ्ठी; घटस्थापनेदिवशी नव्या चळवळीचे रोपटे
कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांनी अलीकडे राबणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, तर ‘चमको’ कार्यकर्त्याना सन्मान ही भूमिका ठेवल्याचे दिसून येत आहे. ज्यांना शिव्या द्यायच्या त्यांच्याच गळ्यात गळे घालून खासदारकी वाचविणे इतकाच त्यांचा अजेंडा बनला आहे. बहुजन समाज आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे आम्ही अनेक कार्यकर्त्यांसह ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडत असल्याची घोषणा भादोले येथील शिवाजीराव माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
शेतकरी केंद्रबिंदू मानून ऊस, दूध, भाजीपाला, भात, नाचणी, कडधान्ये या व इतर पिकांना हमीभाव मिळावा, शेतीला माफक दरात वीज मिळावी यासाठी शेतकरी चळवळीचे नवे रोपटे लावत असून, घटस्थापनेदिवशी (दि. १०) दुपारी ४.३० वाजता कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मेळावा घेत असल्याचे माने यांनी जाहीर केले. मेळाव्यात चळवळीची घोषणा, ध्येयधोरणे, कार्यकारिणी व आंदोलनाची दिशा यांवर विचारमंथन होणार आहे.
माने म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यांवर आंदोलने, मेळावे, खटले यांमध्ये आमचा सहभाग राहिला; पण खासदार शेट्टी हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून प्रस्थापितांना हाताशी धरून त्यांचे राजकारण करीत आहेत. त्याविरोधात पेठवडगाव येथे असंतोष मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी सुकाणू समिती स्थापन केली. त्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही नवी चळवळ उभारण्याचा निर्धार केला आहे, असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, शामराव पाटील, सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, भीमराव पाटील, गोरक्ष पाटील, बाळासाहेब भंडारी, उत्तम पाटील, संतोष शिंदे, राजेश पाटील, विष्णुपंत पाटील, आदी उपस्थित होते.
What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)