राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी निघाले दिल्लीतल्या घेराव आंदोलनाला

सांगली:  कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येत्या 29 व 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत.

खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत मांडलेल्या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या प्रमुख मागण्या आहेत. खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील शेतकऱ्यांच्या 204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. यातूनच देशपातळीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला.

-Ads-

दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी , सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली.

कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवार दि. ३० व शनिवार दि. १ डिसेंबर रोजी दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभीमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

बुधवारी सकाळी १० वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून ही विशेष गाडी रवाना झाली. या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था अशी ‘स्वाभीमानी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेची रचना आहे.  खासदार राजू शेट्टी जिंदाबाद, स्वाभिमानी जिंदाबाद अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते व शेतकरी संसदेकडे रवाना झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
169 :thumbsup: Thumbs up
45 :heart: Love
1 :joy: Joy
26 :heart_eyes: Awesome
33 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)