राजूरचा तणाव निवळला

परिस्थिती पूर्व पदावर; सहा जणांना पोलीस कोठडी
अकोले – अकोले तालुक्‍यातील राजूर येथील तणावाचे वातावरण निवळले आहे. राजूर गावाची परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. या प्रकरणी सहा जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. तर यातील 2 आरोपी राजू हरिभाऊ कानकाटे व नंदू हरिभाऊ कानकाटे यांना औषधी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. उद्या उर्वरित 4 जणांना न्यायालयात हजर केले, जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
राजूर हाणामाऱ्या आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक केली होती. सहा जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या राजू कानकाटे व नंदू कानकाटे या दोघा भावांना अटक केली असली तरीही त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवाखान्यात दाखल केले गेले आहे.
राजूर गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाके वाजविण्यावरून दोन मंडळांच्या गटात हाणामाऱ्या झाल्याने पोलिसांनी जमावाला शांत रहाण्याचे प्रयत्न केले. मात्र काही तरुणांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याप्रकरणी दोन्ही गटातील 50 जणांवर राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला होता. विनायक चोथवे, पंकज मुतडक, श्रीकांत कानकाटे, अक्षय कानकाटे, या आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता अकोले न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)