राजूमामा जाधव याच्यासह चार मटकाकिंग तडीपार

नगर – मटका”किंग’ म्हणून ओळख असलेल्या शहरातील राजूमामा दत्तात्रेय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले राजूमामा जाधव याच्यासह जगदीश वामन वाकोडे (रा. सिव्हिल हडको), संजय रामचंद्र पेठकर (तोफखाना) व विजय गंगाराम गवळी यांचा समावेश आहे. तडीपार करण्यात आलेल्या चार जणांचे शहरातील विविध ठिकाणी मटका चालविण्याचे व्यवसाय आहेत. मुंबई जुगार कायद्याप्रमाणे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी या चार जणांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे टोळी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत चौकशी करून पोलीस अधीक्षक शर्मा यांनी शुक्रवारी या चौघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश काढले. या सर्व प्रकारामुळे मटका अड्डे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

शिवसेनेवर दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ
पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावावर अंतिम कारवाई करून मटकाबुकी राजूमामा जाधव याच्यासह तिघांना जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले. तोफखाना भागातून शिवसेनेने राजूमामा जाधव यांना उतरविण्याची तयारी केली होती. परंतु, राजूमामा जाधव यांच्यावरही तडीपारीची कारवाई झाल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)