#व्हीडीओ: राजु शेट्टींचा भाजप सरकारवर घणाघात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज सत्ताधारी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “साखर कारखानदारांकडे शेतकर्‍यांची असलेली थकबाकी देण्यास टाळटाळ करणार्‍या कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्री स्थगिती देतात यावरुण कुठे तरी भ्रष्टाचाराचा वास येतोय,” असे वक्तव्य त्यांनी केले. सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या थकबाकीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर त्यांना महाराष्ट्रात असेल त्या ठिकाणी वेढा घालू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. पक्षाकडून माढा मतदार संघातून रविकांत तुपकर किवा अनिल पवार उमेदवार असतील असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)