राजुरी शिवारात सदनिकेतून दोन तोळे सोन्यासह 10 हजार लंपास

बेल्हे- अज्ञात चोरट्यांनी राजुरी शिवारातील बंद सदनिका फोडून दहा हजार रुपये रोख आणि दोन तोळे सोने लंपास केल्याची घटना आज (दि. 27) पहाटे घडली.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार राजुरी (ता. जुन्नर) येथील सुशीला रंगनाथ हाडवळे या त्याच्या मुलीकडे मुंबईला गेल्या असल्याने त्यांचे घर दोन दिवसांपासुन बंद होते. आज (दि. 27) त्यांच्या घराजवळ राहत असलेले अशोक हाडवळे यांना सकाळी घराचे दार उघडे दिसले. त्यांनी ही माहिती आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश उगले यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना घरातील कपाटातील सामान खाली जमीनीवर पडलेले दिसले. घरातून चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपये रोख आणि दोन तोळे सोने चोरले असल्याचे सुशीला हाडवळे यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान या परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून आठच दिवसांपूर्वी जाधववाडी येथे बंद बंगला चोरट्यांनी फोडला होता, तर पंधरा दिवसांपूर्वी गुंजाळ वाडी येथे मोठा दरोडा पडला होता आणि त्यात एका महिलेला चोरट्रांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. परीसरात रात्रीची गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)