बेल्हे-राजुरी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिज-यात आज पहाटे एक बिबट्याची मादी अडकल्याची घटना घडली. बेल्हे, राजुरी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पकडण्यात यश मिळालेला या वर्षातला चौथा बिबट्या आहे.त्याला माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात हलविण्यात आले असल्याचे वनरक्षक जेबी सानप यांनी सांगितले.
याबाबत ग्रामस्थाकडून मिळालेली माहीती अशी, बेल्हे-राजुरी (ता. जुन्नर) गांवाच्या सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या (दि. 4 जुलै) रोजी पहाटे पिंजऱ्या अडकला होता. त्यानंतर आज (दि. 14) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उपळी मळ्यामध्ये गणेश नायकवडी यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यजयात सुमारे साडेतीन वर्षाची बिबट्याची मादी अडकली.
दरम्यान राजुरी परीसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला घराच्या अंगणात भुईमूग वाळायला टाकणाऱ्या अक्षदा हाडवळे मुलीला सावज बनविण्याचा प्रयत्न केला. राजुरी येथील ही घटना ताजी असतानाच, गुंजाळ वाडी (खराडीमळा) येथील शिवाजी मनाजी बोरचटे यांच्या गोठ्यात प्रवेश करत दोन शेळ्यांचा फडशा पाडला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी पाच बिबट्यांनी बोरचटे यांच्या घरासमोर तासभर ठिय्या आंदोलन केले.
कोंबरवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात गोविंद कुंजीर हे जखमी झाला होते, तर वंदना किसन यादव या बचावल्या आहेत. ज्या ठिकाणी आज रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला, त्या शेतकऱ्याच्या बिबट्याने एकाच आठवड्यात चार शेळ्या ठार केल्या होत्या, त्यामुळे तेथे पिंजरा लावण्यात आला होता. शेतकऱ्यांनी बिबट्याबाबत समस्या मांडल्यानंतर वन परिक्षेत्राधिकारी येळे, वनरक्षक जे. बी. सानप, वनरक्षक ए. डी. तांगडवार यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा