राजुरी विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील राजुरी माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णासाहेब खेडकर, शांताराम राणे, नसीर बागवान, गणेश कोलते, शरद जगताप, संजय लडकत, कल्पना जगताप, सरला शितोळे, श्रद्धा इथापे उपस्थित होते. यावेळी अप्पासाहेब खेडकर यांनी लोकमान्य टिळकांची सामाजिक वाटचाल, स्वराज्य निर्मिती व स्वातंत्र लढ्यातील कामगिरी स्पष्ट केली. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कमी शिक्षण असतानाही त्यांनी कथा, कादंबऱ्या, साहित्य लिहिले. ज्यामुळे आज ते लोकांच्या मनामनात रुजले आहेत. तसेच त्यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून समाजात जागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)