राजुरीला कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन…!

बेल्हे- राजुरी (ता. जुन्नर) येथे दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला भेटी दिल्या. एमटीडीसी, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, पराशर कृषी पर्यटन केंद्राचे संचालक मनोज हडवळे, गणेश चप्पलवार यांनी कृषी पर्यटन संकल्पना, कृषी पर्यटनाची संधी,मार्केटिंग जाहिरात तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यांमध्ये विविध बॅंकिंग योजना, पर्यटन कर्ज, मुद्रा योजना यांचे मार्गदर्शन सचिन मस्के यांनी करून शेतकऱ्यांच्या शकांचे निरसन केले. आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे संचालक शशिकांत जाधव यांनी कृषी पर्यटनातील इतर जोडव्यवसाय यांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले व्यवसाय व रोजगार संधी यांचे मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनासह विविध महोत्सव शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन मनोज हाडवळे यांनी केले. यावेळी कृषी पर्यटकांच्या विविध योजना काय असणार, यांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती दीपक हरणे यांनी दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)