राजुरीत हिंदू-मुस्लीम वैचारिक बैठक

अणे-जुन्नर तालुक्‍यातील राजुरी या गावात एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक पार पडली. आपली भारतीय संस्कृती जपण्याचा, जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंद-मुस्लिम या बांधवांना एकत्रित येऊन केला आहे.
राजुरी (ता. जुन्नर) या गटाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व गावचे माजी सरपंच माऊली शेळके यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी दीपावली फराळाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार शरद सोनवणे म्हणाले, हा विचारांचा फराळ, विचारांची देवाणघेवाण असून मनामनातील सात्विक वृत्तीचे दर्शन घडवणारी हिंदू-मुस्लिमांची आगळीवेगळी बैठक आहे. या प्रकारचा स्तुत्य उपक्रम तालुक्‍यात प्रथमच मी पाहतोय. सुसूत्रता, चांगल्या प्रकारची विचारधारा असलेली लोकं एकत्र येऊन समाज बांधणी, उभारणीसाठी सक्षमपणे प्रयत्न करतात. या वेळी माऊली शेळके, वसंतराव शेळके, वल्लभ शेळके, विवेक शेळके, गुलाम नबी शेख, पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, रईस भाई चौगुले, गुलाम नबी शेख, डी. बी. गटकळ, घंगाळे, डॉ. दिलीप ताजवे, अशोक औटी, जी. के. औटी, कैलास औटी, शिवाजीराव हाडवळे, कॅ. महादेव हाडवळे, लहु गुंजाळ, सुरेश बोरचटे, दत्तू कणसे, काशीनाथ औटी, विलास सरोदे, रामदास सरोदे, दत्ता औटी, सचिन वाळुंज, अकबर पठाण, कलीम पटेल, बशीर पठाण, बाबू पठाण, जीलानी पटेल, अब्दुल गणी पटेल, सुलतान जमादार, झाकीर पटेल, शौकत चौगुले, अबू बक्कर चौगुले, नजीर शेख, सलीम सय्यद, पप्पू पटेल व मुस्लिम बांधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)