नायगाव- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच पदासाठी चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले, तर सदस्य पदासाठी 29 उमेदवार रिंगणात होते. 16 मे रोजी सदस्य पदाच्या 6 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे 23 उमेदवार सदस्य पदासाठी उभे आहेत. रविवारी (दि.27) सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून सोमवारी (दि. 28) मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.राजुरी ग्रामपंचायतीत सरपंचपदाचे ओबीसी आरक्षण आहे. यावेळी सरपंचपदाच्या थेट निवडणुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळी रंगत निर्माण झाली आहे. सरपंचपदासह ग्रामपंचायतीतही सत्ता राखण्याचा प्रयत्न राहणार आहे, राजुरीमध्ये सरपंचपदासाठी अनेक जण इच्छुक होते; परंतु फॉर्म भरण्याच्या मुदतीअखेर सरपंच पदासाठी 4 अर्ज प्राप्त झाल्याने इतर इच्छुकांच्या नावावर पडदा पडला. राजुरी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता परंतु तो अयशस्वी झाला. येथे सर्वच पॅनेलचे उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत;परंतु घोडा मैदान आता जवळच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)