राजुरीत विद्यार्थ्यांचे मतदान जागृती अभियान

बेल्हे- राजुरी (ता. जुन्नर) येथील गव्हाळी मळ्यात असलेल्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मतदार जागृती आभिमान कार्यक्रम 2019 अंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीसरात घरोघरी जाऊन मतदार जागृती केली. मतदानाची किंमत नाही घेणार – मतदान मात्र जरूर देणार, करूया मतदान – वाढवू देशाची शान, दानात दान श्रेष्ठ दान करूया – आपण मतदान… अशा घोषणा देऊन गव्हाळी परिसरात शिवारफेरी काढली. गव्हाळी शाळेच्या जनजागृती फेरीचे बाळासाहेब हाडवळे,अशोक औटी, पांडुरंग औटी, पोपटराव फावडे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करून स्वागत केले. शिवार फेरीचे नियोजन शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष मालती गोसावी, संजय गडगे यांनी केले. विद्यार्थ्यांनी ही शिवार फेरी लळई, गणेश नगर, गव्हाळीमळा, शिवशंभोनगर, फावडेमळा परिसरात काढली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)